चाळीसगाव: प्रतिनिधी । बंद दुकानाचे पाठीमागील लाकडी व लोखंडी दरवाजांचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी अडीच लाख रोख लंपास केल्याची घटना शहरातील तहसील कार्यालयासमोर घडली शहर पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाविरूध्द फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर तहसील कार्यालय समोरील क्रीश वाईन दुकान दोन दिवसांपासून बंद होते . याचाच फायदा घेत अज्ञात इसमाने दुकानाच्या पाठीमागील लाकडी व लोखंडी दरवाजांचे कुलूप तोडून दोन लाख पन्नास हजार रोख रक्कम व २,०००० हजार रुपये किंमतीचे दोन अॅमरॉन कंपनीच्या इन्व्हर्टरच्या बॅटर्या, ५,००० हजार रुपये किंमतीचे दोन मॉनिटर स्किन एल जी कंपनीचे, २,००० हजार रुपये किंमतीचे एक युपीएस युनिट कंप्युटर पॉवर सप्लायर्स व २,५०० हजार रुपये किंमतीचे एक डिव्हीआर युनिट सीसीटीव्ही कॅमेरा रेकॉर्डिंगचे असे एकूण दोन लाख एकोणऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अम्पास केला
. हि घटना ६ एप्रिलरोजी सायंकाळी ते ७ एप्रिलरोजी सकाळी ७ च्या सुमारास घडली शहर पोलिस ठाण्यात निलेश पाटील (वय – ३६ रा. शास्त्रीनगर ता. चाळीसगाव) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पो नि विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि एन. ए. सैय्यद हे करीत आहेत.