जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील दशरथ नगरात बंद असलेले घराच्याचे खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून आत प्रवेश करत कपाटातून १ लाख १९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विपुल दिलीप भारंबे (वय-३२, रा. दशरथ नगर, जळगाव ) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान त्यांचे कामाच्या निमित्ताने त्यांचे घर ११ मार्च ते १८ मार्च दरम्यान बंद होते. या काळात घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बेडरूमच्या खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून घरात प्रवेश करून त्यांच्या कपाटात ठेवलेले १ लाख १९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार १८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता समोर आला. या संदर्भात विपुल भारंबे यांनी सोमवारी २० मार्च रोजी दुपारी १ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुबारक तडवी करीत आहे.