बंद घर फोडून दोन लाखांचा मुद्देमाल लांबविले !

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील नवेगाव मेहुणबारे येथे बंद घर फोडून चोरट्यांनी घरातून १ लाख ५० हजार रूपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकुण २ लाख ६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लांबविण्याची घटना समोर आली आहे. याबाबत मेहुणबारे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुरेश अभिमन कोकनदे रा. नवेगाव मेहुणबारे ता.चाळीसगाव हे वास्व्याला आहे. त्याच गावात त्यांची आत्या विमलबाई पुंडलिक निकम यादेखील राहतात. सुरेश कोकनदे यांची आत्या विमलबाई ह्या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्या होत्या. १४ नोव्हेंबर रात्री ९ ते १५ नोव्हेंबर सकाळी ११ वाजता दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील गोदरेज कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले १ लाख ५० हजार रुपयांची रोकड आणि ५६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एकुण २ लाख ६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून दिल्याचे समोर आले आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सुरेश कोकनदे यांनी मेहुणबारे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याने विरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड करीत आहे.

Protected Content