बंद घरातून पावणे तीन लाखांचा मुद्देमाल लांबविला

 

चोपडा- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील गरताड गावात बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने २ लाख ८५ हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा मुद्देमाल लांबविण्याची घटना समोर आली आहे. याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, केशरलाल मोतीलाल पाटील वय 46 रा. गरताड ता. चोपडा हे आपल्या कुटुंबीयांचा वास्तव्याला असून खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. १९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री अज्ञात चोट्यांनी त्यांच्या बंद घरातून २ लाख ८५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोकड असा मुद्देमाल लांबवल्याची घटना २० ऑक्टोबर रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास उघडकीला आले. याबाबत केशरलाल पाटील यांनी तातडीने चोपडा शहर पोलीस ठाण्यात गाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चवट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे करीत आहे.

Protected Content