अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील भगवा चौक येथील बंद घर फोडून घरातील रोख रकमेसह सोन्याचे दागिने व महत्वाची कागदपत्रे असा एकुण १ लाख ५२ हजार ४५० रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, दिपक जगन्नाथ सुर्यवंशी (वय-४०) रा. पाटील कॉलनी, भगवा चौक, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सलुन दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करतात. ७ मार्च रोजी दुपारी १२ वाजता हे घर बंद करून बाहेर गेलेले होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कूलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि महत्वाची कागदपत्रे असा एकुण १ लाख ५२ हजार ४५० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. दुपारी ३ वाजता ते घरी आले तेव्हा घराचे कुलूप तेाडलेले दिसून आले. हा प्रकार घडल्यानंतर सायंकाळी ६ वाजता दिपक सुर्यवंशी यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे करीत आहे.