जामनेर, प्रतिनिधी । भालचंद्र नेमाडे यांनी लिहलेल्या एका कादंबरीत बंजारा संस्कृतीतील महिलांविषयी आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आरोप करत त्या कादंबरी प्रकाशनावर शासनाकडुन बंदी घालण्यात यावी तसेच नेमाडेंवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी निषेध व्यक्त करत तहसील व पोलीस प्रशासनला बंजारा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
तहसीलदार अरूण शेवाळे व जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांना निवेदन देण्यात आले. लेखक भालचंद्र नेमाडे लिखित ‘हिंदू-जगण्याची सम्रुद्ध अडगळ’ या कादंबरीमध्ये लभान-गोरबंजारा या समाजातील स्रियांविषयी अश्लील व लिखाण केलेले असून यामुळे अनेक वर्षांपासून आपला सांकृतिक वारसा जपत असलेला बंजारा समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्याने संताप व्यक्त होत आहे. आपल्या दुखावलेल्या भावना शासनाकडे मांडण्यासाठी तालुक्यातील समस्त बंजारा बांधवांनी एकत्र येवुन नेमाडे यांचा निषेध व्यक्त करीत प्रकाशनावर शासनाने बंदी घालण्याची मागणी यावेळी केली.