चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | गोद्री येथे नुकतीच भरविण्यात आलेल्या बंजारा महाकुंभात आ. मंगेश चव्हाण यांनी तालुक्यातील समाज बांधवांना वाहने उपलब्ध करून दिली. तसेच अचूक नियोजन केला. या पार्श्वभूमीवर सरपंच संघटना व तमाम बंजारा समाजाच्या वतीने आज आमदारांचा सत्कार करण्यात आला.
अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व लभाना समाज यांच्या संयुक्त विद्यमाने गोद्री ता. जामनेर जि. जळगाव येथे २५ ते ३० जानेवारी- २०२३ ला कुंभ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. अंधश्रद्धा, व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकून पडलेल्या समाजाला संघटीत करून योग्य दिशा देण्यासाठी व जनजागृती घडवून आणण्यासाठी हा कुंभ भरविण्यात आले. दरम्यान या अभूतपूर्व कुंभाला तालुक्यातील समाज बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून आमदार मंगेश चव्हाण यांनी क्रुझरची व्यवस्था केली. त्यामुळे प्रत्येक तांड्यातील समाज बांधवांना या कुंभाला हजेरी लावता आली. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सरपंच संघटना व तमाम बंजारा समाजाच्या वतीने आज आमदार मंगेश चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. या कुंभाची काल रोजी सांगता करण्यात आली असून एकूण सहा दिवस भरविण्यात आलेल्या या कुंभाला अखेरच्या दिवशी अनेक महंतांनी उपस्थिती लावली.