पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना गुजरात, आंध्रप्रदेश व कर्नाटक या राज्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी दिड लाख कोटी रुपये खर्च करून पुण्यातील तळेगाव येथे राज्याने एक हजार जमिन देण्याचे आश्वाषीत करुन याठिकाणी जमिन, पाणी, विजसह सर्व सुविधा उपलब्ध असल्याने वेदांता-फॉक्सकॉन संचालक यांनी हा उद्योग सुरू करण्याची मानसिकता दर्शविली होती. या प्रकल्पामुळे राज्यातील दिड लाख व या अनुषंगाने येणाऱ्या छोट्या कंपन्यांमुळे राज्यातील ५० हजार युवकांना रोजगार प्राप्त होणार होता. मात्र यास राज्याची ईच्छाशक्ती कमी पडल्याने हा प्रकल्प गुजरात येथे नेण्यात आला.
मुख्यमंत्री म्हणतात की, मी केंद्र सरकारच्या जवळील असुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा प्रकल्प राज्यात ठेवण्यासाठी केंद्रात का आवाज काढत नाही ? राज्यात यासारखाच दुसरा प्रक्लप आणु असे मुख्यमंत्री म्हणतात. या म्हणण्याला तथ्य नसुन महाराष्ट्रातील भाजप व शिंदे सरकारने राज्याला गाजर दाखवण्याचे काम सुरू केले आहे. यासोबतच रायगड मध्ये होणारा ड्रग्स पार्क प्रकल्प परत जाण्याचे संकेत मिळत असुन यामुळेही राज्यातील ५० हजार युवकांचा रोजगार हिरवला जाणार आहे. राज्यात पेट्रोल, डिझेल, गॅस चे दर गणनाला भिडत असतांना मुख्यमंत्री महागाई व बेरोजगार विषयी काहीही बोलत नाही. मात्र वेगळे मुद्दे काढून जनतेची दिशाभूल करण्याचे काम गेल्या तीन महिन्यांपासून चालले आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यात फोडा फोडीचे राजकारण सुरू असुन हे राजकारण लोकशाहीला घातक ठरणारे असल्याचे मत विरोधी पक्षनेते ना. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना सांगितले. मेळाव्याचे अध्यक्षस्थानी विधान सभेचे माजी सभापती अरुण भाई गुजराथी, तर पाहुणे म्हणून आ. एकनाथ खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, मा. मंत्री डॉ. सतिष पाटील, मा. खा. वसंतराव मोरे, आ. अनिल भाईदास पाटील, माजी आ. राजीव देशमुख, माजी आ. दिलीप वाघ, माजी आ. दिलीप सोनवणे, राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्रभैय्या पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, प्रदेश प्रवक्ते योगेश देसले, डॉ. संजीव पाटील, संजय वाघ, विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे व्यासपीठावर होते.
पाचोरा येथील श्री. गो. से. हायस्कूलमध्ये जिजाई रंगमंचाचे उद्घाटन आ. एकनाथ खडसे यांच्या हस्ते तर पाचोरा महाविद्यालयात यशवंतराव मुक्त विद्यापीठाच्या नुतन अभ्यास केंद्र इमारतीचे उद्घाटन मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाल्यानंतर ११:३० वाजता एम. एम. महाविद्यालयाच्या प्रांगणात पाचोरा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास मार्गदर्शन करतांना ना. अजित पवार यांनी सांगितले की, मागील दोन वर्षाच्या कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारने राज्याची घडी विस्कटू दिली नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना अतिशय चांगलं काम सुरू होते. या बाबत कॅटचा अहवाल सुद्धा आलेला आहे. मात्र चांगलं चाललेले काम यांना सहन न झाल्याने राज्यात फोडा फोडीचे राजकारण करुन भाजपा व शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले. फोडा फोडीचे राजकारण करुन बहुमत असल्यानंतरही पुन्हा अनेक ठिकाणी फोडा फोडीचे राजकारण सुरू आहे. नेमके काय झाल्यानंतर यांचे समाधान होईल असा टोलाही पवार यांनी भाजपाला उद्देशुन लगावला. अनेक राज्यात स्तित्यांतर झाले मात्र महाराष्ट्रासारखे देशात कधीही घडले नाही. प्रत्येक पक्षाची विचारधारा वेगळी असु शकते. मात्र त्या – त्या पक्षाच्या प्रमुखांनी आदेश दिल्यानंतर त्या आमदारांनी त्या पक्षप्रमुखाचे म्हणणे ऐकले पाहिजे. मात्र राज्यात सद्यस्थितीचे राजकारण वेगळ्याच वळणावर असुन शिंदे गटाचे ४० आमदार स्वत:ला मुख्यमंत्री संमत आहे. प्रत्येक आमदार अधिकाऱ्यांवर दडपण आणुन बदल्या करण्याची धमकी देतात. ही बाब राज्याला परवडणारी नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले संविधान, घटना, कायदा व नियम बाजुला ठेवण्याचे काम सरकार करत आहे. खत व औषधींचे दर गगनाला भिडलेले असुन गेल्या वर्षी ८८ टक्के कांद्याची निर्यात करण्यात आली होती. मात्र आता केवळ ८ टक्के निर्यात करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता ना. अजित पवार यांनी ते देशाचे राजकारण आपले असल्याचे समजत असल्याने त्यांनी तेथे जावुन बसावे व कांदा निर्यातीचा निर्णय घ्यावा. देशात पेट्रोल, डिझेल व गॅसचे भाव गगनाला भिडले असुन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीमुळे त्यांच्यावर आत्महत्येची वेळ येवु देण्याचे ही सरकार वाट पाहत आहे. राज्यात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर असतांना याकडे लक्ष न देता वेगळे विषय काढुन हे सरकार त्यास फाटा देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत. ४० आमदारांसह १० अपक्ष आमदार फुटल्यानंतर सर्वांनाच मंत्रीपदाचे गाजर दाखविले असुन त्यातील केवळ ९ मंत्रीपदे देवुन मंत्रीपदाचा विस्तार करण्यास टाळाटाळ केली जात आहे. मंत्री पदाच्या विस्तारानंतर ४३ खाते वाटल्यावर शिंदे गटाचे उर्वरित आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे परत जाण्याची भिती असल्याने पुढील मंत्रीपदाचा विस्तार लांबणीवर टाकला जात आहे. अनेक दिवस दोनच मंत्री सरकार चालवत होते. त्यातील १० ते १५ मंत्र्यांना एकही खाते नाही. कृषी खात्याच्या मंत्र्याकडे खनिज खाते देण्यात आले. पण त्या दादा भुसे यांच्याकडे एकही बंदर नाही. महाराष्ट्रात यापुर्वीही अशा घटना कधीही घडल्या नाहीत. अशा शिंदे गट व भाजपा सरकारच्या आमदारांकडून घडत असुन एक आमदार तर हवेत गोळीबार करतो तर कोणी आरे ला कारे चे उत्तर द्या, पोटात लाथा घाला. अशी भाषा वापरत आहे.
राज्यात सत्ता येवुन तीन महिने झाले तरी अनेक जिल्ह्यांना पालकमंत्री पद मिळालेले नसल्याने डी. पी. टी. सी. च्या माध्यमातून होणारा विकास रखडलेला आहे. लम्पी आजारा बाबत हे सरकार गांभीर्याने विचार करत नसुन यामुळे गोधनाचे मोठे नुकसान होणार आहे. सरकारने परदेशातुन लसी आणुन गोधनाचा जीव वाचवावा असे आवाहन ही ना. अजित पवार यांनी यावेळी केले. यावेळी जळगांव जिल्ह्यात मिठ इतके काय अळणी झाले की जिल्ह्यातील पाच आमदार एकनाथ शिंदे यांचेकडे गेले. स्व. बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेकडे बघुन मतदारांनी त्यांना निवडून दिले होते. याआधी अनेकांनी बंडखोरी केली. त्यांना पराभव पत्करावा लागला असुन अशा बाबी लोकांना आवडत नसल्याचे सांगत पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांचेवर टिकास्त्र सोडले. पुढच्या निवडणुकीत पाचोऱ्याला मला काय आवडणार हे मी पाहणार असुन त्यांना त्यांची जागा दाखवली गेली पाहिजे असे सांगत थेट जनतेतून सरपंच व नगराध्यक्ष निवडीच्या निर्णयाला विरोध करत पंचायत समितीचे सभापती, जि. प. अध्यक्ष व राज्याचा मुख्यमंत्री देखील थेट जनतेतुन निवडला पाहिजे असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.
पतीवर्त्यच शिल्लक नसेल तर कितीही दागिणे घालुन काय उपयोग – आ. एकनाथ खडसे
यावेळी आ. एकनाथ खडसे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, या मतदार संघात कै. ओंकार (आप्पा) वाघ यांचा आवाज वाघा सारखा असल्याने त्यांची मतदार संघात मजबूत पकड होती. मात्र आताच्या परिस्थितीत राज्यात फोडा फोडीचे अतिशय घाणेरडं राजकारण सुरू झाले असून ही बाब जनतेला न पटणारी आहे. “५० खोके, एकदम ओके” अशी घटना राज्याच्या इतिहासात कधी ही घडलेली नसल्याने मतदार त्यांना त्यांची जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही. सारे दत्तक घेऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले आहेत. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे आशिर्वाद व धनुष्य बाणाच्या जोरावर हे निवडुन आले असुन त्यांच्याशी गद्दारी केल्याने मतदार त्यांना कधीच माफ करणार नाहीत. हे आमदार आम्ही ५००, ६०० कोटी रुपयांची कामे केल्याचे सांगत असले तरी सत्य, तत्व व निष्ठा त्यांचेकडे नसल्याने त्यांनी पतीवर्तेचे सोंग घेवुन कितीही दागिणे घातले तरी त्याला काहीही अर्थ राहत नसुन मतदार त्यांना त्यांची जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही. यावेळी अरुण भाई गुजराथी व डॉ. सतिष पाटील यांनी ही भाजपा व एकनाथ शिंदे गटावर सडकावुन टिका करत फोडा फोडीचे राजकारण हे लोकशाही ला घातक असल्याचे सांगितले. मा. आ. दिलीप वाघ यांनी आपल्या प्रास्ताविकातुन पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचा लेखा जोखा सादर केला. विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी तब्बल ४२ मानिटे भाषण केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, शहर अध्यक्ष अजहर खान, शामकांत भोसले (भडगाव) राहुल पाटील, कार्याध्यक्ष हर्षल पाटील, विलास सांबरे, युवकांचे तालुका अध्यक्ष स्वप्निल पाटील, अभिजीत पवार, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा रेखा देवरे, रेखा पाटील, शहराध्यक्षा सुनिता देवरे, हर्षदा पाटील, युवतींच्या तालुका अध्यक्षा अभिलाषा रोकडे, दक्षता पाटील, प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, उप प्राचार्य डॉ. वासुदेव वले, प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील, प्रा. डॉ. जी. बी. पाटील, प्रा. राजेश मांडोळे, प्रा. डॉ. श्रावण तडवी, प्रा. डॉ. कमलाकर इंगळे, यांनी सहकार्य केले.