*फैजपूर- लाईव्ह ट्रेन्स न्यूज प्रतिनिधी |* वार्ता फाउंडेशन पत्रकार संघटनेची कार्यकारिणीची बैठक आज रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात घेण्यात आली.
यावेळी सर्वानुमते फैजपूर शहर अध्यक्षपदी मयूर मेढे तर उपाध्यक्षपदी प्रा. राजेंद्र तायडे यांची नियुक्ती करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष योगेश सोनवणे यांनी शहराध्यक्षपदाचा पदभार मयूर मेढे यांच्याकडे सोपवला.
कार्यकारिणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष मयूर मेढे, उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र तायडे, सचिव प्रा. उमाकांत पाटील, सहसचिव जावेद काझी, खजिनदार वासुदेव सरोदे, कार्याध्यक्ष अरुण होले, प्रसिध्दी प्रमुख संजय सराफ व सर्व सदस्य सन्माननीय पत्रकार योगेश सोनवणे, शाकीर मलिक, उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सर्वांनी नूतन कार्यकारिणीचे स्वागत करून अभिनंदन केले.