फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लोकसेवक मधुकरराव चौधरी कॉलेज ऑफ फार्मसी फैजपूर तर्फे आज तिरंगा ध्वज रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
प्रत्येक भारतीयाचा स्वाभिमान असलेल्या स्वातंत्र्य दिनाचा यंदा अमृत महोत्सव साजरा होत आहे. याचा एक भाग म्हणून घरोघरी तिरंगा फडकणार आहे. याचे औचित्य साधून, सन १९३६ मध्ये ग्रामीण भागातील पहिले कॉंग्रेस अधिवेशन पार पडलेल्या ऐतिहासिक भूमीतून लोकसेवक मधुकरराव चौधरी कॉलेज ऑफ फार्मसी फैजपूर येथे तिरंगा ध्वज हातात घेऊन शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच बी.फार्मसी व एम.फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
तसेच भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी महाविद्यालय व फैजपूर शहरातील परिसर दुमदुमून निघाला. तिरंगा झेंड्याची व स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये बलिदान दिलेल्या हुताम्यांचे स्मरण व्हावे, याची नागरिकांना माहिती व्हावी या दृष्टिकोनातून तापी परिसर विदयामंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी या ध्वज रॅलीमध्ये सहभाग नोंदवला.