फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | वारकरी संप्रदायामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचे अभंगाचे संकलन व लेखन संताची जगनाडे महाराज यांनी केल्यामुळे अभंग गाथा सर्व लोकांना उपलब्ध झाली आहे. या अभंगाचा युवकांनी अभ्यास करून अंगातील मार्गदर्शनाप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करावा व संत विचाराचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, असे मसाका संचालक नरेंद्र नारखेडे यांनी संत जगनाडे महाराज जयंती निमित्त उपस्थित यांना सांगितले.
शहरातील सर्व तेली समाज बांधवाकडून श्री संत जगनाडे महाराज जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन गावातील श्रीराम मंदिरात करण्यात आले.
यावेळी स्वामी भक्ती किशोर दास शास्त्री, पवनजी महाराज, प्रवीण महाराज, मसाका संचालक नरेंद्र नारखेडे, मुख्याधिकारी वैभव लोंढे, जी पी पाटील सर, सुनील नारखेडे, आप्पा चौधरी, व सर्व समाज बांधव भगिनी यांची उपस्थिती होती.