फैजपूर, प्रतिनिधी | येथील भवानी माता मंदिरात श्री आई तुळजाभवानी माता मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सव व जीर्णोद्धार, ग्रामप्रदक्षिणा, महापूजा, प्राणप्रतिष्ठा, अभिषेक व होम हवन, पुर्णाहुती आदी कार्यक्रमांचे ५ ते ८ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.
फैजपूर शहरात श्री आई तुळजाभवानी माता मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सव व जीर्णोद्धार भवानी नगर, लक्कडपेठ, कुसुमताई चौधरी विद्यालय जवळील भवानी माता मंदिरात ७ फेब्रुवारीला होणार आहे. प्राणप्रतिष्ठा महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज, महामंडलेश्वर पुरुषोत्तमदास महाराज यांचे हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला खासदार रक्षाताई खडसे, आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे, फैजपूर नगराध्यक्ष महानंदा रवींद्र होले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. चार दिवस चालणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रम पुढील प्रमाणे – दि ५ फेब्रुवारीला ग्रामप्रदक्षिणा व दुर्गादास महाराज खिर्डीकर यांचे रात्री ८ ते १० कीर्तन, दि. ६ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता महापूजा, रात्री ८ ते १० दिपक महाराज, मुक्ताईनगर यांचे जाहीर कीर्तन. दि ७ फेब्रुवारीला सकाळी ९ वा. प्राणप्रतिष्ठा, अभिषेक व होम हवन, सकाळी ९ वा. रात्री ८ ते १० महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांचे प्रवचन होईल. दि ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता पुर्णाहूती, ११ वाजता सत्कार समारंभ, दुपारी १२.३० ते ३ पर्यंत महाप्रसाद. पुरोहित दिपक पाठक, नंदू जोशी, दिनेश जोशी, रवींद्र जोशी, समाधान जोशी, मिलिंद पाठक गावातील ब्राम्हण विधिवत पूजा करणार आहे. पूजेला तीस ते पस्तीस जोडपे बसणार आहे. अध्यक्ष किरण बोरोले, उपाध्यक्ष मोहन चौधरी, सचिव ललित वाघुळदे, सदस्य मयूर बोरोले, राकेश नेहेते, पराग चौधरी, राजेंद्र चौधरी, युवराज चौधरी, पुंडलिक चौधरी, निलेश भिरूड सह ग्रामस्थ परिश्रम घेत आहे.
कार्यक्रमासाठी उपस्थिती द्यावी असे आवाहन समस्त फैजपूर ग्रामस्थ यांनी केले आहे.