फैजपूर प्रतिनिधी । येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने भव्य स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या पंधरवड्याचे उद्घाटन नुकतेच महाविद्यालयात पार पडले.
यावेळी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मधून 28 वर्ष सेवापूर्ती झालेले युवराज गाढे आणि राष्ट्रीय छात्र सेनेचे अधिकारी प्रा. लेफ्टनंट राजेंद्र राजपूत यांच्या प्रमुख उपस्थिती होते.
भारत सरकारच्या क्लीन इंडिया मूव्हमेंटच्या अनुषंगाने 18 महाराष्ट्र बटालियन एन सी सी जळगाव चे समादेशक अधिकारी कर्नल सत्यशील बाबर, प्रशासकीय अधिकारी मेजर सुशील कुमार आणि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ.पी.आर. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी अधिकारी प्रा. लेफ्ट राजेंद्र राजपूत यांनी भव्य स्वच्छता पंधरवाडा विषयी शपथ घेतली. यावेळी एनसीसीचे कडेट्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानिमित्त महाविद्यालयातील परिसर स्वच्छ करण्यात आला तसेच महाविद्यालयातील कै.धनाजी नाना चौधरी यांच्या अर्ध पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली. यावेळी एनसीसी अधिकारी व कडेट्स यांनी स्वतः परिसर स्वच्छ राखून इतरांनाही या अभियानात सामील करण्याची शपथ घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय बाऱ्हे, सुधीर पाटील, दुर्गेश महाजन, तोसिफ तडवी, महेश पाटील यांनी परिश्रम घेतले.