फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर विधानसभा मतदारसंघात ‘डिजिटल मेंबरशिप’साठी दुपारी धनाजी नाना महाविद्यालयातील ग्राउंडवर ‘प्रशिक्षण शिबीर’ घेण्यात आले. यावेळी ग्रामीण व शहरी भागातील कार्यकर्ते हजर होते.
सर्वप्रथम गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार व आ शिरीष चौधरी होते. जि प सदस्य प्रभाकर सोनवणे, हितेंद्र पाटील, आर जी नाना पाटील, जमील शेख, जावेद जनाब, ज्ञानेश्वर महाजन, हरीश गणवानी, बापू पाटील,नितीन चौधरी अट्रावलं, सुनील फिरके, अमोल भिरूड, कादिरखान, कलीम मन्यार, रियाज मेंबर, किशोर महाजन, धनंजय चौधरी व्यासपीठावर उपस्थित होते.
“प्रत्येकात नेतृत्वाची क्षमता आहे. त्यासाठी कार्यकर्यांनी पुढे यावे.” असे म्हणत ‘डिजिटल मेंबरशिप नोंदणी’ची माहिती प्रशासकीय अधिकारी जमील शेख यांनी कार्यकर्ताना करून दिली. त्यामुळे योग्य नोंदणी करता येईल. रावेर, फैजपूर, सावदा, यावल शहरातील बूथ वाईज मेंबरशिप करता येईल.
“रावेर विधानसभा मतदार संघात डिजिटल मेंबरशीप होऊन पक्ष संघटना अजून मजबूत होईल. काँग्रेस पक्ष खऱ्या अर्थाने उभी राहील. तळागाळातील कार्यकर्ता नोंदणी करू शकतात. प्रत्येक बूथवर एक पुरुष महिला यांची निवड होईल. त्यांनी सभासद नोंदणी करावी. असा नावीन्यपूर्ण सदस्य नोंदणीचा कार्यक्रम राबविला जात आहे.” असे आ शिरीष चौधरी यांनी सांगितले
“नोंदणी करताना अडचणी असल्यास तात्काळ मार्गदर्शन करण्यात येईल. प्रत्येक बूथ वर जास्तीत जास्त नोंदणी करावी. प्रत्येक काँग्रेस पदाधिकारी यांनी जनतेशी संपर्क करावा.” असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी आवाहन केले. यावेळी रावेर, सावदा, फैजपूर गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.