फैजपूर ता.यावल (प्रतिनिधी)। जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी तडवी युवका कृती समितीतर्फे भव्य रक्तदान शिबीर शहरातील तडवीवाडा येथे घेण्यात आले.
या शिबिराचे आयोजन आदिवासी तडवी भिल्ल बहुद्देशीय सभागृह तडवीवाडाया ठिकाणी करण्यात आले रक्तदान शिबिर प्रसंगी सर्वप्रथम बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला फैजपूर प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून व स्वतः प्रांताधिकारी डॉ थोरबोले यांनी रक्तदान करून सुरुवात करण्यात आली.
शिबिरात ४५ पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी यावल नगराध्यक्षा नौशादबाई मुबारक तडवी, उपनगराध्यक्ष रशीद तडवी, ॲड. याकूब तडवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता शेख कुर्बान, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, राजू तडवी यांच्याहस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले तर रक्तदान शिबिराला फैजपूर पोलीस ठाण्याचे सपोनि प्रकाश वानखेडे, आसेम संस्थापक अध्यक्ष राजू बिऱ्हाम तडवी, इरफान तडवी सर मुक्ताईनगत, युवा समाज कार्यकर्ता यावल मुबारक फत्तु तडवी,एडव्होकेट इमाम उखर्डू कुसुम्बा मुबारक उखर्डू तडवी, कुसुंबा बु ग्रामपंचायत सदस्य इरफान मुजात तडवी, सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख इकबाल, मलक आबीद सर यांनी भेटी दिल्या या रक्तदान शिबीराला तडवी युनायटेड इंजिनियर्स, तडवी द गाईड, तडवी फैजपुरीयन्स,खिरोदा बॉईज,यावलकर बॉईज यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी रक्तदान शिबिराचे काम शासकिय वैद्यकिय महाविद्यालय जळगाव डॉ.ऊमेश कोल्हे आणि त्यांच्या सहकार्यांनी पाहिले सूत्रसंचालन युनूस शाहदूर तडवी यांनी तर आभार आयोजक आदिवासी तडवी भिल्ल युवा कृती समितीचे अध्यक्ष अजित हुसेन तडवी यांनी मानले रक्तदान शिबिर सोशल डिस्टंसिंगने संपन्न झाले.