फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भावसार क्षत्रिय समाजाचे पुरातन रथ गल्ली भागात नागदेवता, महादेव मंदिर व व हनुमान मंदिर आहे. या ठिकाणी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्याहस्ते महादेव मंदिराचे भूमिपूजन संपन्न झाला.
यावेळी राम मनोहर दास महाराज, खुशाल देवस्थानचे प्रवीण दास महाराज, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ, डॉ. श्रीकांत कुलकर्णी उपस्थित होते. भाजप अध्यक्ष अनंत नेहेते, शिवसेना शहर प्रमुख अमोल निंबाळे, जैन समाजाचे अध्यक्ष अशोक सैतवाल, डॉ श्रीकांत कुळकर्णी, अरुण होले,योगेश सोनवणे, नरेंद्र चौधरी, माजी उपनगराध्यक्ष राकेश जैन,सुनील गोवे, पुरुष महिला भाविक भक्तगण आदी उपस्थित होते.
पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार होणे अत्यंत गरजेचे आहे. मंदिराच्या जीर्णोद्धारनंतर पिढ्यान पिढ्या त्या मंदिराची देखभाल करणे सुद्धा अत्यंत गरजेचे आहे. असे महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांनी मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमासाठी भावसार समाज अध्यक्ष जितू भावसार, खजिनदार संकेत तांबट, ॲड. ऋषील गोवे, कन्हैया इंगळे, डॉ. अमित कुलकर्णी समस्त भावसार समाज व रथगल्ली मित्र मंडळ यांनी परिश्रम घेतले.
30 मार्च रामनवमीच्या दिवशी सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट व रथ गल्ली मित्र मंडळ भावसार समाज यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरचे रक्तदान शिबिर सुभाष चौकातील संजीवनी ब्लड बँकेत होणार असून ज्यांना रक्तदान करायचे त्यांनी या ब्लड बँकेत सकाळी 10 ते 4 या वेळेत उपस्थित राहून रक्तदान करावे असे आव्हान यावेळी करण्यात आले.