फैजपूर प्रतिनिधी । येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या एनसीसी युनिटने ह्यावर्षी एनसीसी अधिकारी व कॅडेटसच्या माध्यमातून ‘जिथे आहात तिथे’ या ब्रीद नुसार आपापल्या परीने स्वतः वृक्षारोपण करून परिसरातील जन सहभागातून वृक्षारोपणाचा उपक्रम यशस्वीपणे राबवला.
धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.आर. चौधरी व १८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगावचे समादेशक अधिकारी कर्नल सत्यशील बाबर यांच्या मार्गदर्शनानुसार महाविद्यालयातील एनसीसी युनिटचे अधिकारी लेफ्टनंट डॉ.राजेंद्र राजपूत यांनी कॅडेट्सच्या माध्यमातून वृक्षारोपनाचा उपक्रम राबविला.
सद्यपरिस्थितीत कोरोना विषाणूचा संसर्ग संपूर्ण जगात थैमान घालत असताना पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी ओळखून आपापल्या परीने घराच्या आजूबाजूला, शेताच्या बांधावर किंवा ओसाड माळरानावर उपयुक्त असे आंबा, चिंच, पिंपळ, वड, कदंब, निम अशा प्रकारच्या उपयुक्त झाडांची लागवड करण्यात आली. यात एनसीसी अधिकारी लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत यांच्यासमवेत ६५ एनसीसी कडेट्सने सहभाग घेऊन सोबत सुमारे १५० लोकांना प्रेरित करून २०० वृक्षांची लागवड केली. यासोबत येणाऱ्या काळात लावलेल्या रोपांचे संगोपन करून त्यांना जगवण्याची शपथ घेतली. वृक्षारोपणाचा या उपक्रमात तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष मा श्री शिरीषदादा चौधरी व सर्व सन्मा. संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, १८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगावचे समादेशक अधिकारी कर्नल सत्यशिल बाबर, प्रशासकीय अधिकारी मेजर सुशील कुमार, सुभेदार मेजर अनिल कुमार यांच्यासमवेत प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, कडेट्स व पालकांनी उस्फूर्तपणे मार्गदर्शन व सहकार्य केले.