Home Cities यावल फैजपूर येथील कुणाल वाघुळदेचे सेट परीक्षेत यश

फैजपूर येथील कुणाल वाघुळदेचे सेट परीक्षेत यश


फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील धनाजी नाना महाविद्यालयातील एमएससीचा विद्यार्थी कुणाल यादवराव वाघुळदे याने सेट परिक्षेत आपले यश संपादन केले आहे.

 

शहरातील धनाजी नाना महाविद्यालयातील एमएससीचा विद्यार्थी कुणाल यादवराव वाघुळदे यांचे मार्च २०२३ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्फत घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत पदार्थ विज्ञान शाखेतून त्यांनी यश प्राप्त केले. विशेष म्हणजे एम.एसस्‍सी. ॲपियर असताना कुणाल वाघुळदे याने यश प्राप्त केल्याने तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष आमदार शिरीष दादा चौधरी व संस्थेचे पदाधिकारी, धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी,  प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी, शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालयाचे कर्मचारी यांनी विशेष कौतुक आणि अभिनंदन केले आहे. कुणाल  वाघुळदे याला प्रा.आर.पी. झोपे व सहकारी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. कुणाल हा लोकसेवक मधुकरराव चौधरी औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयातील कर्मचारी यादव टिकाराम वाघुळदे यांचा मुलगा आहे.


Protected Content

Play sound