फैजपुर, प्रतिनिधी । येथील त्रिवेणी हनुमान मंदिर ते कष्टभंजनदेव, हनुमान मंदिर सुना सावखेडा अशी श्री राम पदयात्रा द्वारे श्री रामजन्मभूमी मंदिर निधी समर्पण संकलन समारोप मोठ्या भक्तिभाव जल्लोषात करण्यात आला
श्री रामजन्मभूमी मंदिर निधी समर्पण संकलन अभियानाचे भुसावळ जिल्हा समितीचे अध्यक्ष महामंडलेश्वर सतपंथरत्न श्री जनार्दन हरिजी महाराज यांच्या सानिध्यात आज दिनांक २० फेब्रुवारी पहाटे ५ वा त्रिवेणी हनुमान मंदिर येथे महाराजांच्या शुभ हस्ते हनुमानजींचे विधीवत पूजन व आरती करून श्रीराम पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला. ही पदयात्रा मधुकर सह. कारखाना आमोदे, बामणोद मार्गे जागृत पुरातन कष्टभंजन हनुमान मंदिर सूनसावखेडा येथे सकाळी १० वा पोहचली. येथे महामंडलेश्वर जनार्दन हरिजी व शास्त्री जगतप्रसाद दासजी यांचे शुभ हस्ते विधीवत पूजन करून महाआरती करून श्रीराम सेवक हनुमान यांच्या चरणी श्रीराम पदयात्रा तसेच श्रीराम जन्मभूमी मंदिर समर्पण निधी अभियानाचे समापन करण्यात आले.
याप्रसंगी अभियानाचे जिल्हाध्यक्ष महामंडलेश्वर जनार्दन म्हणाले संपूर्ण देवगिरी प्रांतातील भुसावळ व जळगाव जिल्ह्यात ५ करोड रुपयांचा स्वेच्छेने समर्पण निधी जमा झाला आहे. यामध्ये ऐतिहासिक फैजपूर शहराने २४ लाख ३८ हजार ४१४ रुपये समर्पण निधी जमा केला आहे. याबाबत महाराजांनी कार्यकर्ते रामसेवक समर्पण दात्यांचे ऋण व्यक्त करीत त्यांना शुआशीर्वाद दिले आहे. याप्रसंगी ते म्हणाले धर्म टिकला तर देश टिकेल, प्रत्येक तरुणाने आपले धर्मकार्य करून राष्ट्राला समर्पित झाले पाहिजे. याप्रसंगी श्रीराम वस्तीचे निधी संकलन प्रमुख मिलिंद पाठक व महाराणा प्रताप वर्षीचे निधी संकलन प्रमुख प्रा. राजेंद्र सिंह राजपूत यांनी आपले अनुभव मांडलेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पप्पू चौधरी यांनी केले. महिनाभरापासून अभियानात सक्रिय असलेल्या राम सेवकांनी येथे राम धून वर मनसोक्त आनंद लुटला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष निलेश राणे ,वैभव वकारे, सुरज गाजरे, संजय सराफ, अक्षय परदेशी, युवराज किरंगे, बाळ आचार्य एकदंत महाराज, अशोक मुखी, गोपी साळी, चंदू वाढे, बबलू महाजन, नितीन पाटील, मधुकर नारखेडे, विनोद परदेशी, रितेश चौधरी, नीरज झोपे, राहुल भोई, युगंधरा चौधरी, गायत्री महाजन, गायत्री वाक्षे, यासह भाविक उपस्थित होते.