फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । फैजपूर शहरात एक सलून व्यावसायिकासह तिघांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्रशानाला प्राप्त झाला त्यामुळे शहरातील बाधितांची संख्या २५ वर पोहचली असून या वृत्ताला मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी दुजोरा दिला आहे.
फैजपूर शहरात आज तीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये शहरातील दक्षिण बाहेरपेठ भागात गेल्या चार दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाच्या परिवारातील दोन सदस्यांच्या समावेश आहे. तर त्याच भागातील एक सलून व्यावसायिक याला सुध्दा कोरोनाची बाधा झाली आहे. दरम्यान फैजपुरातील कोरोना बाधितांची संख्या २५ झाली असली तरी त्यापैकी ८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे तर दोन रुग्ण मयत झाले असून १५ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी दिली आहे. कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत असून जनतेने त्यांना सहकार्य करण्याची गरज आहे.