Home आरोग्य फैजपुरात कोरोना बाधीत आढळलेल्या रूग्णाचा परिसर सील

फैजपुरात कोरोना बाधीत आढळलेल्या रूग्णाचा परिसर सील

0
24

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । शहरात कोरोनाचा संसर्ग झालेला अजून एक नवीन रूग्ण आढळून आला असून त्याचा रहिवास असणार्‍या क्षेत्राचा परिसर सील करण्यात आला आहे.

फैजपूर येथे कोरोनाचा संसर्ग वाढत चाललेला असून काल कोरोना युध्दात मोलाची भूमिका बजावणार्‍या पोलीस अधिकार्‍यालाच या विषाणूने ग्रासल्याने खळबळ उडाली होती. यानंतर आज पुन्हा एक नवीन रूग्ण आढळून आाला आहे. शहरातील कुरेश मोहल्ल्यातील रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती आज प्रशासनाला मिळाली. या वृत्ताला प्रांताधिकारी अजित थोरबोले यांनी दुजोरा दिला आहे. संबंधीत रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून येताच हा परिसर सील करण्यात आलेला आहे. त्या रूग्णांचे कुटुंबिय आणि संपर्कात आलेल्यांना क्वॉरंटाईन करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.


Protected Content

Play sound