Home Cities यावल फैजपुरात आग; घरातील सामान जळून खाक

फैजपुरात आग; घरातील सामान जळून खाक

0
31

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । शहरातील रथ गल्लीत आज लागलेल्या आगीत एका कुटुंबाच्या संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत.

याबाबत वृत्त असे की, शहरातील रथ गल्ली परिसरात आज सकाळी साडेसातच्या सुमारास भीषण आग लागली.शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे. दरम्यान, आग लागूनही बराच वेळ अग्निशामन दलाचे वाहन आले नाही. यामुळे जैन यांच्या घरातील सर्व संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाच्या पथकाने ही आग आटोक्यात आणली.


Protected Content

Play sound