फेरा वाढल्याने बस प्रवाशांना अतिरिक्त दरवाढीचा भुर्दंड

ST Bus 1491275713199

यावल प्रतिनिधी । भुसावळ बसस्थानकावरून सुटणार्‍या व रावेर, चोपडा आणी यावल साठी जाणार्‍या एसटी बसेस फेर्‍याने येत असल्याने अतिरिक्त भाडेवाढ केल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

याबाबत वृत्त असे की, भुसावळ नगर परिषदेच्या माध्यमातुन जुना सातारा रेल्वे पुल ते गवळीवाडा या मार्गावरील रस्त्याचे नुकतेच काँक्रीटीकरण करण्यात आले होते. मात्र हा रस्ता निकृष्ट प्रतिचा बनल्याने याची दुरूस्ती सुरू करण्यात आली आहे. यामुळे या मार्गावरील वाहतुक पुनश्‍च इतरत्र मार्गाने वळवल्याने चोपडा, रावेर व यावल या ठिकाणी जाणार्‍या प्रवाशांकडुन एसटी बस कडुन अतिरिक्त भाडे वसुल करण्यात येत असुन शिवाय प्रवाशांचा सुमारे ३० मिनिटांचा अधिक वेळ वाया जात आहे.

गेल्या एक महीन्या पासुन या मार्गाचे दुरुस्तीचे कासवगतीने चालणारे काम तात्काळ करून प्रवाशांचे अमुल्य वेळ आणी अतिरिक्त भाडेवाढी पासुन मुक्त करावे आणी पुर्वीच्या भाडयाची आकारणी करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

Protected Content