*जळगाव/भुसावळ प्रतिनिधी ।* लग्नात स्वयंपाकासाठी आलेल्या मजूरांना चहा आणण्यासाठी गेलेल्या प्रौढाचा दिपनगर येथील सुरक्षा रक्षकांना केलेल्या बेदम मारहाणीत जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी चौघांविरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, प्रविण नामदेव बऱ्हाटे रा. फेकरी यांच्या मुलीचे आज मंगळवारी गावातच लग्न होते. यासाठी रात्री लग्नात स्वयंपाकासाठी आलेल्या हलवाई व इतर मजूरही हजर झाले होते. रात्री १०.३० वाजेच्या सुमारास त्याचा चहा घेण्यासाठी संजय बळीरात बऱ्हाटे (वय-46) रा. फेकरी ता. भुसावळ हे दिपनगर औष्णिक केंद्राच्या कॅटीनमध्ये जात असतांना त्यांना गेट क्रमांक २१० जवळ उभे असलेल्या खासगी सुरक्षा रक्षक कर्मचारी सागर मोरे, योगेश (पुर्ण नाव माहिती नाही), राजेश बनसोडे (पुर्ण नाव माहिती नाही) यांनी धक्काबुक्की झाली. त्यानंतर धक्काबुक्कीचे मारहाणीत रूपांतर झाल्याने संजय बऱ्हाटे यांना तिघांनी बेदम मारहाण केली. तर कायमस्वरूपी नियुक्त असलेल्या सुरक्षा अधिकारी लोकरे यांनीही शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. यात संजय बऱ्हाटे यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर तिघे खासगी सुरक्षा रक्षक फरार झाले. नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेवून तातडीने भुसावळातील खासगी रूग्णालया दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले.
मयत संजय बऱ्हाटे यांचा मृतदेहा जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन भाऊ, आईवडील, दोन बहिणी तर मुलगा तेजस आणि मुलगी सेजल असा परीवार आहे. संजय बऱ्हाटे यांना मारहाण केल्याची भुसावळ तालुका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून सुरक्षा अधिकारी लोकरे यांना ताब्यात घेतले असून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात सागर मोर, सुरक्षा अधिकारी लोकरे आणि इतर दोघे असे एकुण चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण कुंभार करीत आहे.