जळगाव प्रतिनिधी । शहरातील फुले मार्केट समोरून कापड विक्री व्यवसायीकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, शिशराज महंमद तडवी (वय-४९) रा. सिंधी कॉलनी रोड, फिरस्ती माता मंदीराजवळ नाथवाड हे फुले मार्केटसमोरील गल्लीत किरकोळ कापड विक्रीचा व्यवसाय करतात. यासाठी त्यांचा मुलगा जुबेर तडवी त्यांना मदत करतो. कापड विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी त्यांच्याकडे (एमएच १५ ईयू ६२८७) क्रमांकाची दुचाकी आहे. कापड विक्रीसाठी याच दुचाकीवरून माल ने-आण करण्याचे काम करतात. नेहमीप्रमाणे शनिवार २१ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारा दुचाकीवरून माल आणून दुचाकी ग.स.सोसायटीच्या समोर पार्किंगला लावली. सायंकाळी ६ ते ६.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लांबविली. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून त्यांनी दुचाकीचा आजू बाजूच्या परिसर आणि गल्ली शोधाशोध केली असता मिळून आली नाही. दुचाकी मिळून आली नाही म्हणून आज शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. शिशराज तडवी यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस कर्मचारी करीत आहे.