जळगाव प्रतिनिधी । महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने शहरातील फुले मार्केट परिसरात आज १७ मार्च रोजी अचानक धडक कारवाई करत विनापरवाना पेप्सी विक्री करणाऱ्या दुकानदारांवर प्रत्येकी ५ हजार रूपयांचा दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे फुले मार्केट परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाला फुले मार्केट मधील किरकोळ रिटेल व होलसेल विक्री करणाऱ्या दुकानांवर बेकायदेशीर पेप्सी विक्री होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार गेल्या चार दिवसांपासून महापालिकेच्या आरोग्य विभागाने फुले मार्केट परिसरात पथकाच्या माध्यमातून टेहाळणी केली होती. आज उपायुक्त पवन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य स्वच्छता व आरोग्य निरीक्षक संजय अत्तरदे, अतिक्रम विभागाचे अधिक्षक संजय ठाकूर यांच्यासह महापालिकेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी आज सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास फुले मार्केटमध्ये धडक कारवाई केली. यावेळी विनापरवाना पेप्सी विक्री करणाऱ्या १० ते १२ दुकानांवर कारवाई करत मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर प्रत्येकी पाच हजार रूपये दंडात्मक कारवाई करून ५० ते ५० हजार रूपये वसूल केला आहे.
https://www.facebook.com/508992935887325/videos/958986961519621