फुलगाव शिवारात दहा फूटी अजगर पकडून वनपरिसरात सोडले

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील वरणगाव येथून जवळ असलेल्या फूलगाव शेत शिवारातील उसाच्या शेतात दहा फूटी अजगराचा सर्पमित्रांनी पकडून फॅक्टरी वनपरिसरात सोडून जीवदान दिले.

अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील फूलगाव शिवारातील शरद साहेबराव चौधरी यांच्या शेतात उसतोडणी सुरु आहे . दुपारी दोनचे सुमारास उसतोडणी कामगारांच्या समोर अचानक दहा फूटी अजगर आला. त्याला पाहून कामगार ऊस तोडणी सोडून शेताच्या बाहेर पळाले. त्यांच्यापैकी काहींचे प्राण सुध्दा गेले असते. परंतु शेतमालकाने लागलीच परिसरातील सर्पमित्रांना मोबाईलवरून खबर दिली. त्याच क्षणी परिसरातील सर्पमित्र भुषण कोळी, अमर सोनार, अक्षय तेली, स्वप्नील सुरवाडे, स्वप्नील मोरे, उज्वल राणे शेतामध्ये हजर झाले व त्या सर्वांनी मिळून अजगरास पकडले. त्या क्षणी उसतोड कामगारांनी सुटकेचा निश्वास सोडला व पुन्हा उसतोडीस सुरुवात केली. शेतमालकांने सर्वांचे आभार मानले. त्या अजगरास फॅक्टरी वनक्षेत्रहद्दीत सोडून जीवदान देण्यात आले.

Protected Content