फुकटाचा नाष्ट्यासाठी दुकानदाराना मारहाण करणारे दोघे अटकेत

जळगाव प्रतिनिधी । फुकट नाष्टा करून पैसे न देता जाणाऱ्याला नाश्त्याचे शंभर रुपये द्यावे लागतील असे म्हटल्याचा राग येवून त्याच्यासह एकाने विक्रेत्यास लोखंडी कड्याने मारहाण केली होती. या गुन्ह्यातील दोघांना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंधी कॉलनी भागात बबलाराम नारायण तलरेजा यांचे नमकीन विक्रीचे दुकान असून ते नाश्ताची गाडी लावतात. २३ ऑगस्ट रोजी दोन जण करुन शंभर रुपयांचे पार्सल पॅक केले व निघुन जात असतांना पैशांची मागणी केली म्हणून तलरेजा यांना बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

दाखल गुन्ह्यातील संशयितांना अटक करण्यासाठी पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या पथकातील सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, रमेश चौधरी, गणेश शिरसाळे, मिलींद सोनवणे, योगेश बारी अशांनी उमेश ऊर्फ मायकल कन्हैय्या नेतलेकर (रा. सिंगापूर कंजरवाडा – जळगाव) आणि आकाश नंदु लोहाळेकर (रा. नवभारत डेअरीजवळ नाथवाडा जळगाव) यांना अटक केली. दोघांना न्यायालयात हजर केले असता न्या. ए.एस.शेख यांच्या न्यायालयात हजर केले असता तिन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकारतर्फे अ‍ॅड. निकम यांनी कामकाज पाहिले. 

 

Protected Content