Home Cities चोपडा फराळ वाटप करून आदिवासी कुटुंबांच्या चेहऱ्यावर मिळाले समाधान

फराळ वाटप करून आदिवासी कुटुंबांच्या चेहऱ्यावर मिळाले समाधान


चोपडा प्रतिनिधी । निमगव्हाण तापी फाऊंडेशन , राजे प्रतिष्ठान व शिवसेना परिवार चोपडा यांच्यातर्फे शहरातील कष्ठकरी आदिवासी प्रवर्गातील ५२ कुटुंबाना दिवाळी सणाप्रीत्यर्थ ‘भरू या वंचितांची झोळी, साजरी करू या संग दिवाळी’ या उदात्त भावनेतून नमकीन, मिठाई, बिस्कीट आदी साहित्याचे वाटप करून आगळी वेगळी दिवाळी साजरी करण्यात आली.

बालगोपाळ चिमुकल्यांना फराळ वाटप झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. यावेळी राजे प्रतिष्ठानचे जिल्हा संघटक दिव्यांक सावंत, तापी फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल बाविस्कर, युवासेना शहर संघटक नंदू गवळी, मंगेश पाटील, प्रशांत पाटील, लिलाधर बाविस्कर, गोलू मराठे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound