फरार ‘डॉ. बॉम्बला’ कानपूरमधून अटक

aropila

 

कानपूर वृत्तसंस्था । अजमेर बॉम्बस्फोटातील फरार गुन्हेगार मोहम्मद जालीस अन्सारी उर्फ डॉ. बॉम्ब याला उत्तर प्रदेशातील कानपूर येथून अटक करण्यात आली असून आरोपीला लखनऊ येथे आणण्यात येणार असून सध्या त्याची चौकशी सुरू आहे. अन्सारीला कानपूर येथे अटक केल्याची माहिती उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक ओ.पी. सिंह यांनी दिली.

अजमेर येथे १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात सीबीआयने मुंबईच्या आग्रीपाडा येथे राहणाऱ्या जालीस अन्सारी याला अटक केली होती. चौकशीमध्ये त्याचा देशभरात झालेल्या इतर अनेक बॉम्बस्फोटात त्याचा सहभाग असल्याचे समोर आले. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जालीस याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जालीस याला अजमेर येथील तुरुंगात ठेवण्यात आले होते. तुरुंगातूनच त्याने पॅरोलच्या सुट्टीसाठी अर्ज केला. या अर्जावर सर्वोच्च न्यायालयाने त्याला २१ दिवसांची सुट्टी मंजूर केली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जालीस याला अजमेर येथून मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात आणि तेथून २८ डिसेंबरला बाहेर सोडण्यात आले. त्यानंतर जालीस हा दररोज सकाळी १० ते १२ वाजताच्या सुमारास आग्रीपाडा पोलिस ठाण्यात येऊन हजेरी देत होता. मात्र, गुरुवारी तो हजेरीसाठी आलाच नाही. कशी केली असता त्याच्या मुलाने जालीस सकाळपासून बेपत्ता असल्याचे सांगितले. त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करीत पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता.

Protected Content