भुसावळ प्रतिनिधी । एक वर्षांपासून फरार असलेला आणि दोन वर्षांकरीता हद्दपार केलेला आरोपीला भुसावळ शहर पोलीसांनी अटक केली असून आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भुसावळ शहर पोलीस ठाण्यात भाग ५ गुरनं ९६/२०१९ प्रमाणे भादवि १४३, १४४, १४७, ४२७ प्रमाणे संशयित आरोपी मुकेश प्रकाश भालेराव (वय-२५) रा. राहुल नगर, भुसावळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित आरोपी मुकेश फरार होता. दरम्यान याचा आरोपीला विविध गुन्ह्याच्या कलमाखाली २ वर्षाकरीत हद्दपार करण्यात आले आहे. संशयित आरोपी ह्या कुख्यात गुंड असून त्यांच्या विरोधात भुसावळ शहर पोलीस स्टेशन, भुसावळ तालुका पोलीस स्टेशन, फैजपूर पोलीस स्टेशन, शनिपेठ पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हे दाखल आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी गजाजनन राठोड, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रविंद्र बिऱ्हाड, पो.कॉ. श्रीकृष्ण देशमुख, प्रशांत परदेशी यांच्यासह पोलीस कर्मचारी शहर पोलीसांनी संशयित आरोपी याला ताब्यात घेतले असून आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.