मुंबई: वृत्तसंस्था । राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोविड चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्या नंतर ते होम क्वारंटाइन झाले आहेत. संपर्कात आलेल्यांना चाचणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे
फडणवीस यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली आहे. ‘लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे.’ असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
लॉकडाऊनच्या काळात ते सातत्यानं राज्यात दौरे करत होते.. पक्षानं बिहार निवडणुकीची जबाबदारी टाकल्यानंतर ते बिहारलाही जाऊन आले होते. अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पुणे व सोलापूरचा दौरा केला होता. या दौऱ्यांतून त्यांचा अनेकांशी संपर्क आला होता. त्यातूनच त्यांना संसर्ग झाला असण्याची शक्यता आहे.