फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट ; राजकीय वर्तुळात चर्चेला उधान

मुंबई (वृत्तसंस्था) उद्धव ठाकरे यांना राज्यपालनियुक्त सदस्य म्हणून नियुक्त करावे अशी शिफारस राज्य मंत्रिमंडळाने पाठवून ११ दिवस उलटले तरी राज्यपाल कोश्यारी यांनी त्यावर निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांना लक्ष्य केले होते. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यपालांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे.

 

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषद सदस्यपदी नियुक्त करण्याचा प्रस्ताव मंजूर करावा यासाठी आतापर्यंत काही नेते आणि अधिकाऱ्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यपालांची भेट घेतली. दरम्यान, ही भेट कोरोना उपाययोजना आणि पालघर येथे सांधुंसह तिघांच्या हत्या प्रकरणाविषयी असल्याचे बोलेले जात आहे. परंतू मुख्यमंत्र्यांच्या विधानपरिषद सदस्यत्वाविषयीदेखिल चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत नाही. दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची २८ मे पूर्वी विधानपरिषद सदस्यपदी नियुक्ती केली नाही तर ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागेल आणि राज्यातले महाआघाडी सरकार अडचणीत येईल, असे बोलले जात आहे.

Protected Content