मुंबई (वृत्तसंस्था) देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिल्ली आणि राज्यातील काही नेते एकत्र मिळून महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी ‘झी २४ तास’शी संवाद साधला. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी की, . एकीकडे भाजपचे नेते राजकारण करायचे नाही, म्हणून सांगतात. पण देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिल्ली आणि राज्यातील काही नेते सातत्याने सरकार अडचणीत कसे येईल, हे पाहत आहेत. अगदी सुब्रमण्यम स्वामी यांनी उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा दिलेला सल्ला या कटाचा भाग आहे. सरकार अस्थिर करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. आज राज्यावर संकट आले असताना त्याला सामोरे जायचे सोडून भाजप राजकारण करु पाहत आहे. भाजपची कृती ही महाराष्ट्रद्रोही आहे. ‘महाराष्ट्र बचाव’ नव्हे तर ‘भाजप बचाव’ अशी त्यांची भूमिका असल्याची टीका थोरात यांनी केली.