फटाके बंदीच्या निर्णयाला आव्हान ; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । फटाक्यांवर बंदी घालण्याच्या कोलकात्ता उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

“सण महत्त्वाचे आहेत, हे आम्ही समजू शकतो. पण सध्या आयुष्यच धोक्यात आहे. सध्या जीवन वाचवण्यापेक्षा मोठी मूल्ये कोणतीच असू शकत नाही” असे न्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांनी म्हटले आहे.

कोलकाता उच्च न्यायालयाने गुरुवारी काली पूजा, दिवाळी आणि छट पूजेच्यावेळी पश्चिम बंगालमध्ये सर्व प्रकारचे फटाके फोडण्यावर बंदी घालण्याचा आदेश दिला.

कोरोना पार्श्वभूमीवर फटाके विक्रीवरही बंदी घातली. एक जनहित याचिकेवर सुनावणी करताना कोलकाता उच्च न्यायालयाने हा आदेश दिला.

.
दिवाळी पाच दिवसांवर आली असताना मुंबई महापालिकेने फटाके फोडण्यावर बंदीचा निर्णय घेतला. फटाके विक्रीस मात्र मुभा असणार आहे. फटाक्यांवरील निर्बंधामुळे मागणीअभावी विक्रेत्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याच्या भीतीने यंदा दिवाळीमध्ये फटाके फोडण्यास बंदी घालण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला. केवळ लक्ष्मीपूजनच्या दिवशी फुलबाजे आणि अनारसारख्या फटाक्यांना परवानगी देण्यात आली आहे.

अन्य आवाजाच्या फटाक्यांवर बंदी असून, आदेश धुडकावून फटाक्यांची आतषबाजी करणाऱ्यांविरुद्ध पालिका आणि पोलिसांमार्फत कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणीच नव्हे तर हॉटेल, क्लब, जिमखाना, संस्था, व्यावसायिक परिसर आदी ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत.

Protected Content