जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय येथे दुसरी व तिसरीच्या विद्यार्थ्यांची गणपती मूर्ती बनवण्याची ऑनलाईन कार्यशाळा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. ऑनलाईन कार्यशाळा दोन सत्रात घेण्यात आली एकूण १०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
या कार्यशाळेसाठी पहिल्या शाळेचे शिपाई सुनील नारखेडे यांची मुलगी हर्षदा नारखेडे यांनी विद्यार्थ्यांना गणपती मूर्ती कशा प्रकारे तयार केली जाते. याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांकडून ते करून घेतले.गणपती बनवण्यासाठी शाळूमाती तसेच पर्यावरणपूरक रंगांचा वापर करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. दुसऱ्या सत्रात वैशाली रेवागडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी अचूक निरीक्षण करून पर्यावरण पूरक गणपती तयार केले. कार्यशाळेचे आयोजन उपशिक्षक योगेश भालेराव व सूर्यकांत पाटील यांनी केले तर मुख्याध्यापिका रेखा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.