Home करियर प.वि.पाटील विद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण सोहळा

प.वि.पाटील विद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण सोहळा


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. चालू शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या विविध क्रीडा तसेच शालेय स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस , भेटवस्तू ,प्रमाणपत्र आदींनी गौरविण्यात आले.

त्यात प्रत्येक वर्गातून प्रथम आलेले , हस्ताक्षर , रांगोळी , स्मरणशक्ती , चित्रकला , शिल्पकला , वक्तृत्व यासारख्या बौद्धिक तर धावणे , लिंबू चमचा , बेडूक उडी , कराटे , डोक्यावर वही घेऊन चालणे यांसारख्या क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना या वेळी गौरविण्यात आले.त्यातील काही बक्षिसे ही पालक शिक्षक संघाकडून प्रदान करण्यात आली तर काही संस्थेच्या दान दात्यांच्या माध्यमातून देण्यात आली.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून एस.एस.पाटील ( बक्षीस दाते) , अविनाश चौधरी ( बक्षीस दाते ) शालेय शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी पालक शिक्षक संघाचे सर्व सदस्य तसेच मुख्या.रेखा पाटील उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका कल्पना तायडे व धनश्री फालक यांनी केले तर आभार प्रदर्शन योगेश भालेराव यांनी मानले.


Protected Content

Play sound