प.वि.पाटील विद्यालयात मराठी राजभाषा दिनानिमित्त कार्यक्रम

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

 

सर्वप्रथम मराठी राजभाषा दिना निमित्त विद्यार्थ्यांनी सुरुवातीला राज्यगीत म्हणून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर शाश्वत कुलकर्णी या विद्यार्थ्याने मराठी राजभाषा दिनानिमित्त माहिती सांगितली तसेच कार्तिक मोरे यांनी कुसुमाग्रजांची भूमिका सादर केली लावण्या झांबरे हिने बहिणाबाई चौधरी यांची भूमिका सादर करून बहिणाबाईंची कविता म्हटली इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी मराठी साहित्य प्रकारांची ओळख एका नाट्यीकरणाद्वारे केली त्यात विद्यार्थिनींनी कथा , कविता , चरित्र , प्रवास वर्णन इत्यादी सारखे मराठी साहित्याच्या विविध प्रकारांची ओळख नाट्यीकरणातून  करून दिली कार्यकमाच्या अध्यक्षा सौ रेखा पाटील व प्रमुख पाहुणे अशोक चौधरी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना तायडे यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिपाली चौधरी , चारुलता भारंबे, स्वाती पाटील या उपशिक्षिकांनी परिश्रम घेतले .

Protected Content