पारोळा प्रतिनिधी । सायकलवरून ९ हजार किलोमीटर सायकलने प्रवास करणाऱ्या तरूणाने पाच राज्यात प्लास्टीक बंदीसाठी जनजागृती अभीयान राबवित आहे. या तरूणाने पारोळा शहरात आल्यावर स्वागत करण्यात आले.
ब्रिजेश शर्मा रा. मध्य प्रदेश असे या तरूणाचे नाव आहे. या तरूणाने १७ सप्टेंबर २०१९ गांधीनगर गुजरात येथून सायकलवर एकूण ९ हजार दोनशे किलोमीटरचा प्रवास करत आतापर्यंत पाच राज्यात प्लास्टिक बंदीसाठी जनजागृती अभियान राबवले असून संपूर्ण भारतात जनजागृती करण्याचे त्यांचे ध्येय आहे. आज १८ रोजी त्यांनी पारोळा शहराला भेट देत पारोळा शहरात प्लास्टिक बंदीसाठी जनजागृती केली. त्यांच्या याकामासाठी नगरपरिषदेच्या व लोकनियुक्त नगराध्यक्ष करण बाळासाहेब पाटील यांच्या वतीने त्यांना प्रोत्साहन पत्र देण्यात आले. यावेळी आरोग्य सभापती दीपक अनुष्ठान, नगरसेवक मनीष पाटील, संदीप साळुंके, कार्यालय अधीक्षक व गौरव बडगुजर उपस्थित होते.