Home Cities जळगाव प्र. कुलगुरू माहुलीकर यांना बडतर्फ करण्याची राष्ट्रवादीची मागणी

प्र. कुलगुरू माहुलीकर यांना बडतर्फ करण्याची राष्ट्रवादीची मागणी

0
40

mahulikar

जळगाव, प्रतिनिधी । येथील कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्रमोद माहुलीकर यांनी शोध निबंध चोरी केल्याचा आरोप जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिव एड. कुणाल पवार यांनी केला असून त्यांनी माहुलीकर यांना पदावरून तात्काळ काढण्याची मागणी कुलगुरू प्राध्यापक पी. पी. पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनाचा आशय असा की, विद्यापीठाचे प्र.कुलगुरू प्रमोद माहुलीकर यांनी दोन नियतकालिकांमधून संशोधन चोर्य करून हे काम स्वतःचे असल्याचे दर्शविले आहे. हे असे करणे नैतिकतेच्या आधारावर गुन्हा मानला जातो व सदरील कृत्य उघड झाल्यानंतर संपादकांना वाचकांची जाहीर माफी मागुन सदरील शोध निबंध बाद (retract ) केल्याचे संकेतस्थळावर दिसत आहे. शिवाय RETRACTION या अधोरेखित झाले आहे. सदरील बाव हि कायम स्वरूपी संकेतस्थळावर असल्याने जगजाहीर आहे. हि सदर बाब शैक्षणिक गुणवत्येच्या दृष्टीने नामुष्कीची बाब असून इतर विद्यापीठात असे कृत्य करणाऱ्या संशोधकांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. परंतु, आपल्या विद्यापीठात त्याबाबत राज्यपाल ह्यांचेकडून देखील कारवाईचे आदेश असतांना देखील त्यांच्यावर कारवाई कोणाच्या सांगण्यावरून होत नाही हे देखील जाहीर करावे अशी मागणी एड. कुणाल पवार यांनी केली आहे. त्यांनी  प्र.कुलगुरू माहुलीकर यांना तत्काळ पदावरून काढण्यात यावे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन छेडेल जाईल असा इशारा दिला आहे.


Protected Content

Play sound