जळगाव, प्रतिनिधी । प्र. कुलगुरू डॉ. महुलीकर हे दि.२ एप्रिल रोजी एबीव्हीपीच्या फेसबुक पेजवर विद्यापीठाच्या आढावा सांगण्यासाठी लाईव्ह आले होते. त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव जिल्हा महानगर, फार्मसी स्टूडेंट कौन्सिल आदींनी याचा निषेध करत प्र. कुलगुरू महुलिकार यांना विद्यापीठ प्रशासन पगार देते का एबीव्हीपी पगार देते असा प्रश्न उपस्थित केला आहे.
प्र. कुलगुरू माहुलीकर यांनी एका संघटनेच्या पेजवर जातांना मुख्य कुलगुरूंना सांगितले होते का ? तसे लेखी कळविले होते का ? त्याचे तोंडी आदेश भेटले होते का ? ते पण जाहीर करा अशी मागणी करण्यात आली आहे. अजून त्यांनी कोणतीही माहिती विद्यार्थ्यांना न देता फक्त टाईमपास केला व विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्न प्रलंबितच राहिले आहेत. वर्क फ्रॉम होम हे ज्या टीचर्सला दिले होते त्यांनी पूर्ण केलं का ? काही ऑनलाइन चर्चा तुम्ही इतर डाइरेक्टर्स सोबत केली का ? त्याचा तपशील आपल्याकडे ऊपलब्ध आहे का ? असे विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. लॉक डाऊनमध्ये आपण विद्यापीठात जाऊन काही निर्णय घेतलेत का? या सर्व प्रकरणाचा खुलासा करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव जिल्हा महानगर सचिव ऍड. कुणाल पवार, फार्मसी स्टूडेंट कौन्सिल महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भुषण भदाने, माजी सिनेट सदस्य अतुल कदमबांडे, युवती जिल्हाध्यक्ष कल्पित पाटील, अमोल राजपूत नंदुरबार आदींनी केली आहे.