अमळनेर प्रतिनिधी | तालुक्यातील वासरे येथील ५२ वर्षाच्या इसमाने आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपविल्याची करूण घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,वासरे ता अमळनेर येथील भागवत प्रकाश पाटील (वय ५२ वर्ष) या वयस्क इसमाने खेडी शिवारातील गावाबाहेर स्मशानभूमीलगत असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला असल्याचे आढळून आले.ही घटना ९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.गावातील दीपक पांडुरंग पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून मारवड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान भागवत पाटील यांनी व कुटुंबाने काही दिवसांपूर्वी दोन बिघे शेत विकून बँकेचे कर्ज फेड केले होते.नेमके याच विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे परिसरात बोलले जात आहे. तर या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.