Home राजकीय प्रियंका गांधींना मानसिक विकार- स्वामींचा धक्कादायक आरोप

प्रियंका गांधींना मानसिक विकार- स्वामींचा धक्कादायक आरोप

0
39

नवी दिल्ली वृत्तसंस्था । प्रियंका गांधी यांना मानसिक विकार असून त्या लोकांना मारहाण करत असल्याचा धक्कादायक आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.

प्रियंका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशावर भाजप नेते जोरदार टीका करत आहेत. यात या पक्षाचे बोलभांड नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आज अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीकास्त्र सोडले आहे. आज ते म्हणाले की, प्रियांका गांधी मानसिक रुग्ण आहेत. तोल ढळला की लोकांना मारहाण करतात, त्यांना बायपोलर नावाचा रोग झाल्याचा सनसनाटी आरोपदेखील स्वामींनी केला आहे. या आजारामुळे माणसाचा तोल ढळला की तो लोकांना वेड्यासारखा मारत सुटतो. यामुळे माणूस हिंस्त्रही होतो. प्रियांकाचा तोल कधी ढळेल आणि कधी त्या हिंस्त्र होतील याचा थांगपत्ताही लोकांना लागणार नसल्याचे वक्तव्य स्वामी यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound