प्रा. लोटन पाटील यांना पीएच. डी. प्रदान

चोपडा, प्रतिनिधी | तालुक्यातील वढोदा येथील रहिवासी व श्रीमती एच. आर. पटेल कला महिला महाविद्यालय शिरपूर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. डॉ. लोटन झावरु पाटील यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.

 

प्रा. डॉ. लोटन झावरु पाटील यांनी A Spatio Temporal Variation in Demographical Characteristic in Dhule District of Maharashtra State — या विषयावर संशोधन केले असून त्यांना संशोधनासाठी डॉ. बी.डी. पाटील आर.सी. पटेल महाविद्यालय शिरपूर जि.धुळे तसेच डॉ. एस.के. शेलार गंगामाई महाविद्यालय नगांव जि.धुळे यांचे मार्गर्शन लाभले. त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी शालेय शिक्षण मंत्री मा. आ. अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष राजगोपाल जी भंडारी , महाविद्यालयाचे प्राचार्यl डॉ. शारदा जे. शितोळे, उपप्राचार्य डॉ. के. बी. पाटील भूगोल विभाग प्रमुख डॉ. आर. एम. वाडीले , महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर बंधू भगिनींनी त्यांचे अभिनंदन केले.

Protected Content