चाळीसगाव, प्रतिनिधी । यावल परिसरात कार्यरत असलेले इयत्ता नववीचे विद्यार्थी भन्ते पयशिष यांना निवृत्त प्राध्यापक गौतम निकम यांनी ग्रंथ संपदा भेट दिली.
भन्ते पयशिष हे इयत्ता तिसरीत शिक्षण घेत असतानाच आई-वडिलांचे देवाज्ञा झाल्याने तो एकलकोंडा झाला होता. काय करावे आणि काय करू नये काहीच सुचेनासे झालेले असताना दरम्यान त्यांनी चिवर घेतली. आणि खऱ्या अर्थाने तेथूनच त्याचा जीवनाच्या प्रवासाला सुरुवात झाली. भन्ते पयशिष हा सध्या इयत्ता नववीच्या वर्गात शिकत असून यावल परीसरात धम्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी कार्यरत आहेत. त्यामुळे भविष्यात आपल्या अभ्यासात भर पडून ज्ञान हा परिपक्व होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करावे या दृष्टिकोनातून भन्ते पयशिष यांनी चाळीसगाव येथील निवृत्त प्राध्यापक गौतम निकम यांच्या घराला २४ जून रोजी भेट दिली. भेटीच्या वेळी प्रा. गौतम निकम यांनी शिक्षणातील पुढील पाया पक्का होण्यासाठी भन्ते पयशिष यांना ग्रंथ संपदा भेट दिली. यावेळी निवृत्त प्राध्यापक गौतम निकम, भन्ते पयशिष व सोनाली लोखंडे आदी उपस्थित होते.