एरंडोल : प्रतिनिधी । एरंडोल येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील महाविद्यालयीन ज्युनियर कॉलेज विभागाचे पर्यवेक्षक व राज्यशास्त्र विषयाचे शिक्षक प्रा.नरेंद्र भिमराव गायकवाड हे राज्यशास्त्र या विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत ते एरंडोल महाविद्यालयात गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अमित पाटील, प्राचार्य प्रा. एन. ए. पाटील, उपप्राचार्य आर. एस. पाटील व संस्थेचे सर्व संचालक, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.