रावेर, प्रतिनिधी । आज दिवाळी असून सुध्दा गरीब व गरजु कुटुंबाच्या घरापर्यंत रेशनची साखर पोहचु शकली नाही. रावेर पुरवठा विभागाला अत्यंदोय शिधपत्रिकाधारक कुटुंबाची नियमित साखर प्राप्त असतांना प्राधान्य कुटुंबाची नियतन साखर मंजूर असून शासनाकडून अजुनपर्यंत रावेर गोडाऊनमध्ये साखर प्राप्त झाली नाही. शासनाने साखर देण्यास उशीर करून भर दिवाळीत प्राधान्य कुटुंबाच्या तोंडाचा गोडवा पळविला आहे.
प्राधान्य कुटुंबाची नियतन साखरेच्या उपलब्धताबाबत रावेर पुरवठा अधिकारी हर्षल पाटील यांनी माहिती देतांना सांगितले की, दिवाळीचा सण लक्षात घेता मागील सप्टेंबरपासून आम्ही अत्यंदोय सोबत प्राधान्य गरीब कुटुंबाना सुध्दा रेशनद्वारे सारख देण्याच्या मागणी आम्ही शासनाकडे करतोय. शासनाने अत्यंदोय शिधपत्रीकाधारकाची साखर पाठवली आहे. तसेच प्राधान्य कुटुंबाना देखील साखर देण्यासाठी नियतन मंजूर आहे. मात्र साखर अद्यापही रावेर गोडाऊनमध्ये प्राप्त झाली नाही. येत्या दोन चार दिवसात साखर नक्की प्राप्त झाल्यावर आम्ही तात्काळ रेशन दुकानांद्वारे प्राधान्य कुटुंबाना वितरित करणार आहे. तसेच आदिवासी भागात लाभार्थांना रेशन वितरण करतांना नेटव्हर्कचे खुप प्रॉब्लम येतोय माझ पूर्ण लक्ष याच आदिवासी भागात असल्याचे पुरवठा अधिकारी श्री. पाटील म्हणाले. रावेर शहरतील रेशन दुकानदार विठ्ठल पाटील म्हणतात यावेळी पुरवठा अधिका-याच्या आदेश्यावर आम्ही मागील पाच दिवसांपासून रेशन दुकान रात्री उशिरा पर्यंत उघडून बसलोय. आज दिवाळीच्या दिवशी सुध्दा दुकान उघडून येणाऱ्या प्रत्येकाला शासनाकडून मिळालेले धान्य वितरण करतोय. आम्हाला जास्त करून प्राधान्य कुटुंबाचे लाभार्थी साखर बद्दल विचारतात. परंतु आमच्याकडे साखर उपलब्ध नसल्याचे त्यांना आम्ही सांगत आहे.