अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कै. श्री.र. सा.पाटील प्राथमिक शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. आजपर्यंत आपण फक्त हायस्कूल व महाविद्यालयीन स्तरावर असे कार्यक्रम झालेले किंवा आपण सर्व्यांनी पाहिलेले असतील. पण प्राथमिक शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा कार्यक्रम आयोजित करणारी ही एकमेव शाळा ठरली आहे.
याप्रसंगी विद्यार्थीनी औदुंबरी वाघ, चेतना पाटील, सत्यम पाटील, ललित चौधरी, ऋषिकेश पाटील, प्रतिक्षा पाटील, रुचा पाटील व चारुदत्त देशमुख यांनी मनोगत व्यक्त करीत असताना त्यांच्या शैक्षणिक जीवनात कशाप्रकारे शाळेच्या शिक्षकांच्या बहुमूल्य वाटा होता. त्यांचे जीवन कशा प्रकारे संस्कारक्षम बनवले, याचे वर्णन अतिशय भावनिक व हृदयस्पर्शी शब्दात विद्यार्थ्यांनी मांडले. मागील आठवणींना उजाळा देत जीवनाला आकार देणारे शिक्षकांचे व शाळेचे आभार मानले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळेच्या मुख्याध्यापिका स्वप्ना शिसोदे मॅडम यांनी स्वीकारले. व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून विजयसिंह पवार संचालक, साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्र व उपशिक्षक डी. वाय. चौधरी शिरसाळे हायस्कूल व सन्मानित प्रदिप अग्रवाल संचालक खा.शि.मंडळ अमळनेर यांनी विद्यार्थ्यांना करियर बद्दल मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुरज मोरे व संजना पाटील या विद्यार्थ्यांनी केले. व आभार प्रदर्शन प्रांजल पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अनंतकुमार सूर्यवंशी, सुरेखा पाटील, जागृती दहिवदकर, बबीता चौधरी, वैशाली साळवे, दिलवरसिंग पाटील, प्रशांत पवार, सुरेश पवार, वैशाली चव्हान, सुनंदा चौधरी, मनीषा पवार, मंगला चौधरी, दीपा चौधरी, संगीता पाटील, कीर्ती बडगुजर, नलिनी बडगुजर, मनीषा कासार, नगराज सोनवणे यांनी परिश्रम घेतले.