Home आरोग्य प्राण्यांच्या चाव्यांवर ६६२ जणांनी घेतले इंजेक्शन

प्राण्यांच्या चाव्यांवर ६६२ जणांनी घेतले इंजेक्शन

0
43

जळगाव, प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्राणी चावल्यावर घ्यावयाचे इंजेक्शनसाठी दररोज बाधित रुग्ण उपचार करायला येतात. जुलै महिन्यात ३८८ जणांनी तर ऑगस्ट महिन्यात २३ ऑगस्टपर्यंत २७४ जणांनी इंजेक्शन घेऊन उपचार घेतले. प्राण्यांमध्ये माणसांना सर्वाधिक चावे  कुत्र्यांनी घेतले आहे. 

 

रुग्णालयात ओपीडी वेळेत कक्ष क्रमांक १०५ मध्ये तर दुपारून आपत्कालीन विभागात हे इंजेक्शन दिले जाते. जुलै महिन्यात कुत्र्यांचे चाव्यामुळे ३६६ रुग्णांनी उपचार घेतले. यात २२३ पुरुष, ६१ महिला, ५३ लहान मुले, २९ लहान मुली अशांचा समावेश आहे. याशिवाय उंदीर चावल्यावर ५ पुरुष, १ मुलगा, मांजर चावल्यामुळे ५ पुरुष, ३ महिला, ३ लहान मुलं, घोडा चावला म्हणून १ पुरुष तर गाय चावली म्हणून २ पुरुष, १ महिला व १ लहान मुलाने उपचार घेतले आहे.  ऑगस्ट महिन्यात २३ दिवसात कुत्र्याच्या चाव्यावर २७० जणांनी उपचार घेतले. यात  यात १६३ पुरुष, ५२ महिला, ४१ लहान मुले, १४ लहान मुली अशांचा समावेश आहे. याशिवाय उंदीर चावल्यावर २ पुरुष, मांजर चावल्यामुळे १ पुरुष, डुक्कर चावला म्हणून १ पुरुषाने उपचार घेतले आहे.

दरम्यान, भटक्या व पाळीव प्राण्यांपासून लहान मुलांना शक्यतोवर दूर ठेवा असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित यांनी केले आहे. कोणताही प्राणी चावला तर उपचार घेण्यासाठी तातडीने रुग्णालयात यावे. कुत्रा चावला तर जखमेवर परस्पर मलमपट्टी करू नये. वाहत्या पाण्याखाली जखम धुवावी. तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे इंजेक्शन घेण्यासाठी यावे. त्यानंतर दिलेल्या पुढील तारखांना इंजेक्शनचे उर्वरित डोस घ्यावेत असेही डॉ. गावित यांनी कळविले आहे.

 


Protected Content

Play sound