जळगाव, प्रतिनिधी । कवियत्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ येथे व इतर महाविद्यालयात प्राचार्य पद रिक्त असतांना फक्त एकाच महाविद्यालयात संशयास्पद होणाऱ्या प्राचार्यपद भरतीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व फार्मसी स्टूडेंट कौन्सिलतर्फे शिक्षण संचालक यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
तक्रारीचा आशय : नरडाणा येथील मधुकर राव सीसोदे महाविद्यालयांच्या प्राचार्य पदासाठी महाविद्यालयाने ऑगस्ट २०१९ मध्ये प्रस्ताव दाखल केला होता. तो प्रस्ताव शासन, विद्यापीठ, शिक्षण उपसंचालक यांनी डिसेंबर २०१९ मध्ये मान्य केला .त्यानुसार महाविद्यालयाची प्राचार्य पदाची भरती जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये होणे क्रमप्राप्त होते. परंतु, सदर जाहिरात ६ मे रोजी लॉक डाऊनच्या काळात देण्यात आली. ती का व कोणासाठी देण्यात आली.अशी कोणती आर्थिक आणीबाणी होती की संपूर्ण जग कोरोना सारख्या महामारीमध्ये होरपळत असतांना या मे महिन्यात जावई शोध लावण्यात आला व ती जाहिरात विद्यापीठाचे प्र – कुलगुरू, शिक्षण उपसंचालक यांच्या मान्यतेने प्रकाशित करण्यात आली. ती जाहिरात प्रकाशित करत असतांना ईमेल का दिला नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. कोणच्या आदेशाने किवा दबावाने ई मेल दिला नाही ह्यात काही मर्जीतल्या लोकांचेच अर्ज दाखल करता यावे ह्यासाठी तर हे केलेल षडयंत्र नाही ना अशी शंका उपस्थित करण्यात आली आहे. या जाहिरातीसाठी शिंदखेडा तालुक्यातील प्राचार्य यांचा मोठा हात आहे व शिक्षण उपसंचालक व विद्यापीठाचे प्र कुलगुरू माहुलीकर ह्या सर्वांमध्ये पैशांचा मोठा व्यवहार झाला आहे असे दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे तसेच लॉक डाऊनमध्ये कोणतीही निवड समिती येणार नाही हे महित असतांना महाराष्ट्र विद्यापीठ कायदा नवा,तसेच विद्यापीठ अनुदान आयोग स्पेशल केस कडून ऑनलाईन मुलाखत घेण्याचा मार्ग प्र कुलगुरू व शिक्षण उपसंचालक यांनी खुला केला अशी चर्चा पण सुरू आहे. यापूर्वी महाराष्ट्रात अशी कोणत्या विद्यापीठात ऑनलाईन पद भरती झालेली असेल तर ते पण जाहीर करावे. कोणी एक प्राचार्य ३१ मे २०२० रोजी सेवानिवृत्त होत आहे त्यासाठी राजकीय पाठबळ देण्यासाठी हा सर्व खटाटोप कोणच्या सांगण्यावरून केला जात आहे हे देखील ह्या मंडळीने जाहीर करावे असे आव्हान करण्यात आले आहे. हे सर्व प्रकरण संशयास्पद आहे म्हणून प्राध्यापक संघटनेने पण निवेदन दिली आहे.आहे. महाराष्ट्र शासनाने मागील महिन्यात निर्णय घेतला की नवीन पदभरतीला तूर्तास मंजुरी नाही तरी ही पदभरती कशी काय काढली गेली ? सदर निर्णय ह्या मंडळीस लागू होत नाही की ह्यांचे काही वेगळे शासन आहे हे न उमगणारे प्रश्न समोर येत आहेत. प्राचार्य पद भरती ही लॉक डाऊन नंतर स्वच्छ सर्वाना अर्ज करण्याची प्रामाणिक संधी देवून विद्यार्थी हित लक्षात घेवून पारदर्शक पद्धतीने घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर जळगाव जिल्हा राष्ट्रवादी महानगर सचिव ऍड. कुणाल पवार, फार्मसी स्टूडेंट कौन्सिल महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भुषण संजय भदाणे, माजी सीनेट सदस्य अतुल कदमबांडे, राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, गणेश निंबाळकर, नंदुरबार फार्मसी स्टूडेंट कौन्सिलचे अमोल राजपूत, गौरव वाणी आदींच्या स्वाक्षरी आहेत.